मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
प्रकरण ६ :
मानवी हक्क न्यायालये :
कलम ३० :
मानवी हक्क न्यायालये :
राज्य शासन, मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत उद्भवणाऱ्या अपराधांची संपरीक्षा त्वरेने होण्याच्या प्रयोजनासाठी, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सहमतीने अधिसूचनेद्वारे प्रत्येक जिल्ह्याकरिता उक्त अपराधांची संपरीक्षा करण्यासाठी सत्र न्यायालय हे मानवी हक्क न्यायालय असल्याचे विनिर्दिष्ट करील :
परंतु, त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यान्वये अशा अपराधांसाठी जर, –
(a)क)(अ) सत्र न्यायालय हे विशेष न्यायालय असल्याचे आधीच विनिर्दिष्ट केले असेल ; किंवा
(b)ख)(ब) विशेष न्यायालय आधीच घटित करण्यात आलेले असेल,
तर या कलमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.
