मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम २७ :
राज्य आयोगाचे अधिकारी व इतर कर्मचारी :
१) राज्य शासन आयोगाला,-
(a)क)(अ) राज्य शासनाच्या सचिव या पदापेक्षा कमी दर्जाचे पद नसलेला एक अधिकारी, जो राज्य आयोगाचा सचिव असेल ; आणि
(b)ख)(ब) पोलीस महानिरीक्षकाच्या पदापेक्षा कमी दर्जाचे पद नसलेल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली पोलीस व अन्वेषण कर्मचारी वर्ग आणि राज्य आयोगाची कामे क्षमतापूर्वक पार पाडण्यासाठी आवश्यक असलेला इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग,
उपलब्ध करुन देईल.
२) राज्य शासन या संदर्भात करील अशा नियमांना अधीन राहून, राज्य आयोग त्याला आवश्यक असेल असा इतर प्रशासकीय, तांत्रिक आणि वैज्ञानिक कर्मचारी वर्ग नियुक्त करु शकेल.
३) पोट-कलम (२) अन्वये नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांची वेतने, भत्ते आणि सेवेच्या अटी, राज्य शासन विहित करील त्याप्रमाणे असतील.