मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ७ :
विवक्षित परिस्थितीमध्ये सदस्याने सभाध्यक्ष म्हणून काम करणे किंवा त्यांची कामे पार पाडणे :
१) सभाध्यक्षाच्या मृत्यूमुळे, त्याच्या राजीनाम्यामुळे, किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे त्याचे पद रिक्त झाल्यास अशा प्रसंगी, राष्ट्रपतीस अधिसूचनेद्वारे, सदस्यांपैकी एका सदस्यास, असे रिक्त पद भरण्यासाठी नवीन सभाध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत, सभाध्यक्ष म्हणून काम करण्यास प्राधिकृत करता येईल.
२) जेव्हा अनुपस्थितीमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे सभाध्यक्ष आपली कार्ये पार पाडण्यास असमर्थ असेल तेव्हा, राष्ट्रपती या संबंधात अधिसूचनेद्वारे प्राधिकृत करील असा एक सदस्य, परत कामावर रुजू होण्याच्या दिनांकास सभाध्यक्षाची कार्ये पार पाडील.