Phra 1993 कलम ४२ : अडचणी दूर करण्याचा अधिकार :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ४२ :
अडचणी दूर करण्याचा अधिकार :
१) या अधिनियमाचे उपबंध अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवली तर, केंद्र सरकार ती अडचर दूर करण्यासाठी, त्यास आवश्यक किंवा इष्ट वाटतील असे, या अधिनियमाच्या उपबंधाशी विसंगत नसलेले उपबंध, शासकीय राजपत्रात, प्रकाशित केलेल्या आदेशाद्वारे करता येतील :
परंतु, या अधिनियमाचा प्रारंभ झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढता येणार नाही.
२) या कलमान्वये काढण्यात आलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल.

Leave a Reply