मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
प्रकरण ८ :
संकीर्ण :
कलम ३६ :
आयोगाच्या अधिकारितेच्या अधीन नसलेल्या बाबी :
१) आयोग, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये रीतसर घटित करण्यात आलेल्या राज्य आयोग्यासमोर किंवा कोणत्याही अन्य आयोगासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही बाबींच्या संबंधात चौकशी करणार नाही.
२) आयोग किंवा राज्य आयोग, मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतची कृती ज्या दिनांकास घडल्याचे अभिकथित करण्यात आले असेल त्या दिनांकापासून एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर, त्या बाबीसंबंधात चौकशी करणार नाही.