मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ३१ :
विशेष सरकारी अभियोक्ता :
राज्य शासन, अधिसूचनेद्वारे, प्रत्येक मानवी हक्क न्यायालयासाठी, त्या न्यायालयात खटले चालवण्याच्या प्रयोजनाकरिता, सरकारी अभियोक्ता विनिर्दिष्ट करील किंवा ज्याने सात वर्षापेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी अभियोक्ता म्हणून व्यवसाय केलेला असेल, अशा अभियोक्त्याची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करील.