मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम २० :
आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल :
१) आयोग, केंद्र सरकारला आणि संबंधित राज्य शासनाला वार्षिक अहवाल सादर करील आणि कोणतीही बाब वार्षिक अहवाल सादर करेपर्यंत लांबणीवर टाकण्यात येऊ नये इतक्या तातडीची किंवा महत्वाची आहे असे आयोगास वाटत असेल तर, अशा कोणत्याही बाबी संबंधातील विशेष अहवाल आयोग, कोणत्याही वेळी सादर करु शकेल.
२) केंद्र सरकार, आणि यथास्थिति, राज्य शासन, आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल, आयोगाच्या शिफारशीनुसार घेतलेल्या किंवा घेण्याचे प्रस्तावित केलेल्या कार्यवाहीच्या ज्ञापनासह, आणि शिफारशी अस्वीकृत केल्यास त्याबाबतच्या कारणांसह, अनुक्रमे संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर किंवा, यथास्थिति, राज्य विधान मंडळाच्या सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था करील.