Phra 1993 कलम १६ : पूर्वग्रहामुळे बाधा पोहचलेल्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम १६ :
पूर्वग्रहामुळे बाधा पोहचलेल्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे :
आयोग, चौकशीच्या कोणत्याही टप्प्यावर, –
(a)क)(अ) त्याला जर कोणत्याही व्यक्तीच्या वर्तणुकीबद्दल चौकशी करणे आवश्यक वाटले; किंवा
(b)ख)(ब) चौकशीमुळे एखाद्या व्यक्तीच्या नावलौकिकास पूर्वग्रहामुळे बाधा पोचण्याची शक्यता आहे असे त्याचे मत झाले,
तर, त्या व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची आणि तिच्या बचावासाठी पुरावे सादर करण्याची वाजवी संधी देऊ शकेल :
परंतु, जेव्हा साक्षीदाराच्या विश्वासाचा अधिक्षेप करण्यात येईल तेव्हा या कलमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.

Leave a Reply