Phra 1993 कलम १५ : व्यक्तींनी आयोगाकडे केलेले निवेदन :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम १५ :
व्यक्तींनी आयोगाकडे केलेले निवेदन :
आयोगापुढे साक्ष देण्याच्या ओघात एखाद्या व्यक्तीने केलेले निवेदन हे, अशा निदेदनाद्वारे खोटी साक्ष देण्याबद्दल होणाऱ्या खटल्याव्यतिरिक्त एरव्ही त्या व्यक्तीला कोणत्याही दिवाणी फौजदारी स्वरुपाच्या खटल्यात गुंतवणार नाही किंवा त्या व्यक्तीच्या विरुद्ध त्याचा वापर केला जाणार नाही :
परंतु, असे निवेदन,-
(a)क)(अ) आयोगाने त्यास उत्तर देण्यास भाग पाडलेल्या कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल केलेले असले पाहिजे; किंवा
(b)ख)(ब) चौकशीच्या विषयवस्तूशी संबंधित असले पाहिजे.

Leave a Reply