मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ११ :
आयोगाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग :
१) केंद्र सरकार, आयोगाला,-
(a)क)(अ) भारत सरकारच्या सचिवाच्या दर्जाचा एक अधिकारी, जो आयोगाचा महासचिव असेल, आणि
(b)ख)(ब) पोलीस महासंचालकाच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली आयोगाची कामे सक्षमतेने पार पाडण्यासाठी आवश्यक असेल असा पोलीस व अन्वेषण कर्मचारी वर्ग व इतर अधिकारी व कर्मचारी,
उपलब्ध करुन देईल.
२) केंद्र सरकार त्या बाबतीत तयार करील अशा नियमांना अधीन राहून आयोग आवश्यक असेल असा इतर प्रशासकीय, तांत्रिक आणि वैज्ञानिक कर्मचारीवर्ग नियुक्त करील.
३) पोटकलम (२) खाली नियुक्त केलेले अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचे वेतन, भत्ते आणि सेवेच्या शर्ती विहित करण्यात येतील, त्याप्रमाणे असतील.