Peca कलम ४ : इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सचे उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण आणि जाहिरात यांचा प्रतिबंध :

इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
कलम ४ :
इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सचे उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण आणि जाहिरात यांचा प्रतिबंध :
या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेसच कोणतीही व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे-
१) इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सचे, पूर्ण उत्पादनाच्या स्वरूपात असो किंवा त्याचे कोणतेही भाग असो, उत्पादन किंवा निर्मिती किंवा आयात किंवा निर्यात किंवा वाहतूक किंवा विक्री किंवा वितरण करणार नाही; आणि
२) इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सची जाहिरात करणार नाही किंवा अशा कोणत्याही जाहिरातीमध्ये भाग घेणार नाही, जी थेट किंवा अप्रत्यक्षपणे इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सचे प्रचार करतात.

Leave a Reply