इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध (उत्पादन, विनिर्माण, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) अधिनियम २०१९
सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींसाठी इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे उत्पादन, उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात प्रतिबंधित करणारा अधिनियम.
भारतीय प्रजासत्ताकाच्या सत्तरव्या वर्षी संसदेने खालीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
कलम १ :
संक्षिप्त नाव आणि प्रारंभ :
१) या अधिनियमाला इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक (उत्पादन, विनिर्माण, आयात, नियात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) अधिनियम २०१९ असे म्हणावे.
२) हा १८ सप्टेंबर २०१९ रोजी अमलात आला असे मानले जाईल.