Peca कलम ११ : कंपन्यांकडून होणारे गुन्हे:

इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
कलम ११ :
कंपन्यांकडून होणारे गुन्हे:
१) जेव्हा या कायद्याअंतर्गत एखादा गुन्हा एखाद्या कंपनीने केला असेल, तेव्हा गुन्हा घडण्याच्या वेळी, कंपनीच्या तसेच कंपनीच्या व्यवसायाची जबाबदारी असलेली आणि कंपनीला जबाबदार असलेली प्रत्येक व्यक्ती गुन्ह्यासाठी दोषी मानली जाईल आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास आणि त्यानुसार शिक्षा करण्यास पात्र असेल :
परंतु असे की, या पोटकलमात समाविष्ट असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे अशा कोणत्याही व्यक्तीला या कायद्यात तरतूद केलेल्या कोणत्याही शिक्षेस पात्र ठरणार नाही, जर त्याने हे सिद्ध केले की गुन्हा त्याच्या माहितीशिवाय करण्यात आला आहे किंवा त्याने असा गुन्हा रोखण्यासाठी सर्व योग्य ती काळजी घेतली आहे.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही असले तरी, जर या कायद्याअंतर्गत गुन्हा एखाद्या कंपनीने केला असेल आणि तो गुन्हा कंपनीच्या कोणत्याही संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकाऱ्याच्या संमतीने किंवा संगनमताने केला गेला आहे किंवा त्याच्याकडून झालेल्या कोणत्याही निष्काळजीपणामुळे झाला आहे हे सिद्ध झाले तर, अशा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकाऱ्यालाही गुन्ह्यासाठी दोषी मानले जाईल आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास आणि त्यानुसार शिक्षा करण्यास पात्र असेल.
स्पष्टीकरण:
या कलमाच्या प्रयोजनासाठी, –
(a)क) अ) कंपनी म्हणजे कोणतीही कॉर्पोरेट संस्था (निगमित निकाय) आणि त्यात फर्म किंवा व्यक्तींची इतर संघटना समाविष्ट आहे; आणि
(b)ख) ब) संचालक म्हणजे कंपनीतील पूर्णवेळ संचालक आणि फर्मच्या संबंधात, फर्ममधील भागीदार.

Leave a Reply