इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
कलम १० :
जप्त केलेल्या साठ्याची विल्हेवाट लावण्याचा अधिकार :
न्यायालयासमोरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आणि या कायद्याच्या तरतुदींनुसार अधिकृत अधिकाऱ्याने जप्त केलेला साठा इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा साठा असल्याचे सिद्ध झाल्यास, अशा साठ्याची विल्हेवाट फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) च्या प्रकरण ३४ मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींनुसार लावली जाईल.