Pcr act कलम ७: अस्पृश्यतेमधून उद्भवणाऱ्या अन्य अपराधांबद्दल शिक्षा :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम ७:
अस्पृश्यतेमधून उद्भवणाऱ्या अन्य अपराधांबद्दल शिक्षा :
जो कोणी,-
(a)(क)(अ) संविधानाच्या अनुच्छेद १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही हक्क वापरण्यास तिला प्रतिबंध करील; किंवा
(b)(ख)(ब) एखादी व्यक्ती असा कोणताही हक्क वापरीत असताना तिची छेड काढील, तिला इजा करील, त्रास देईल, अटकाव करील अथवा अटकाव करवील किंवा करवण्याचा प्रयत्न करील अथवा एखाद्या व्यक्तीने असा कोणताही हक्क वापरला या कारणावरुन तिची छेड काढील, तिला इचा करील, त्रास देईल किंवा तिच्यावर बहिष्कार टाकील; किंवा
(c)(ग) (क) तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे अथवा विक्षेपाद्वारे किंवा दृश्यप्रतिरुपणांद्वारे किंवा अन्य प्रकारे कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीवर्गाला किंवा सर्वसाधारण जनतेला कोणत्याही स्वरुपात अस्पृश्यता पाळण्यास चिथावणी देईल किंवा उत्तेजन देईल; १.(किंवा)
(d)(घ)१.(ड) अनुसूचित जातीच्या एखाद्या व्यक्तीचा अस्पृशते च्या कारणावरुन अपमान करील किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करील,
२.(तो, एक महिन्याहून कमी नाही व सहा महिन्यांहून जास्त नाही इतक्या मुदतीच्या कारावासास व शंभर रुपयांहून कमी नाही व पाचशे रुपयांहून जास्त असणार नाही अशा द्रव्यदंडासही पात्र होईल.)
३.(स्पष्टीकरण १ :
एखाद्या व्यक्तीने पुढील गोष्टी केल्यास तिने अन्य व्यक्तीवर बहिष्कार टाकला असे मानले जाईल,-
(a)(क)अ) जर तिने अशा अन्य व्यक्तीला एखादे घर किंवा जमीन भाड्याने देण्याचे नाकारले अथवा तिला ती वापरण्याची किंवा ताब्यात घेण्याची परवानगी नाकारली अथवा अशा अन्य व्यक्तीशी व्यवहार करण्याचे, तिच्यासाठी मजुरीने काम करण्याचे किंवा तिच्याबरोबर धंदा करण्याचे नाकारले अथवा रुढीने चालत असेलेली एखादी सेवा उपलब्ध करुन देण्याचे किंवा तिच्याकडून ती करुन घेण्याचे नाकारले अथवा उक्त गोष्टी सामान्य व्यवहारक्रमानुसार सर्वसामान्यपणे ज्या अटींवर करण्यात आला असत्या त्या अटींवर त्यापैकी एखादी गोष्ट करण्याचे नाकारले तर; अथवा
(b)(ख)ब) अशा दुसèया व्यक्तीशी तिने सर्वसाधारणपणे जे सामाजिक, व्यावसायिक किंवा व्यापारधंदेविषयक संबंध ठेवले असते ते ठेवण्याचे तिने टाळले तर.
१.(स्पष्टीकरण २ :
एक) जर एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अस्पृश्यते ची अथवा कोणत्याही स्वरुपात तिचे पालन करण्याची जाहीर शिकवण दिली तर, किंवा
दोन) जर तिने ऐतिहासिक, तत्वज्ञानविषयक किंवा धार्मिक कारणांच्या आधारावर किंवा जातिव्यवस्थेच्या कोणत्याही परंपरेच्या आधारावर किंवा इतर कोणत्याही आधारावर कोणत्याही स्वरुपातील अस्पृश्यता पालनाचे समर्थन केले तर,
खंड (क(ग)) च्या प्रयोजनार्थ, ती व्यक्ती अस्पृश्यता पाळण्यास चिथावणी देते किंवा प्रोत्साहन देते असे मानले जाईल.)
1A)१क)१.(१अ) संविधानाच्या अनुच्छेद १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही हक्क तिने वापरल्याबद्दल प्रतिशोध किंवा बदला म्हणून जर कोणी, त्या व्यक्तीचे शरीर किंवा मालमत्ता याबाबत अपराध केला तर, असा अपराध दोन वर्षाहून जास्त मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल त्याबाबतीत अपराध करणारी व्यक्ती दोन वर्षाहून कमी असणार नाही इतक्या मुदतीच्या कारावासास आणि द्रव्यदंडासही पात्र होईल)
२) आपल्याच समाजाच्या किंवा त्यातील कोणत्याही वर्गाच्या एखाद्या व्यक्तीने अस्पृश्यता पाळण्यास नकार दिला किंवा अशा व्यक्तीने या अधिनियमाच्या उद्दिष्टांच्या पुर:सरणार्थ एखादी कृती केली या कारणावरुन जो कोणी, –
एक) तिला अशा समाजाचा किंवा वर्गाचा घटक म्हणून त्या व्यक्तीला जो हक्क किंवा विशेषाधिकार मिळू शकेल तो नाकारील, किंवा
दोन) अशा व्यक्तीवरील जातिबहिष्कारात कोणत्याही प्रकारे भाग घेईल,
२.(तो, एक महिन्याहून कमी नाही व सहा महिन्याहून जास्त नाही इतक्या मुदतीच्या कारावास व शंभर रुपयांहून कमी नाही व पाचशे रुपयांहून जास्त नाही अशा द्रव्यदंडासही पात्र होईल.)
——–
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ९ अन्वये (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ९ अन्वये (१९-११-१९७६ पासून) मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ९ अन्वये (१९-११-१९७६ पासून) नवीन क्रमाकं देण्यात आला.

Leave a Reply