नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम ७अ(क):
१.(अवैधपणे सक्तीने श्रम करावयास लावणे हे अस्पृश्यता पालन आहे असे केव्हा मानावे :
(१) जो कोणी, एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यते च्या कारणावरुन, कोणतेही मेहतरकाम किंवा सफाईगाराचे काम अथवा एखाद्या प्राण्याचा मृतदेह उचलण्याचे किंवा तो फाडण्याचे किंवा नाळ तोडण्याचे किंवा अशाच प्रकारचे इतर कोणतेही काम करण्याची सक्ती करील त्याने अस्पृश्यते मधून उद्भवणारी नि:समर्थता लादली आहे असे मानले जाईल.
(२) ज्या कोणी, अस्पृश्यते मधून उद्भवणारी नि:समर्थता लादली आहे असे पोटकलम (१) अन्वये मानले जाईल तो तीन महिन्यांहून कमी नाही व सहा महिन्यांहून जास्त असणार नाही इतक्या मुदतीच्या कारावासास आणि शंभर रुपयांहून कमी नाही व पाचशे रुपयांहून जास्त असणार नाही इतक्या द्रव्यदंडासही पात्र होईल.)
——-
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम १० अन्वये समाविष्ट करण्यात आले.