Pcr act कलम ६: माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करुन देण्याचे नाकारल्याबद्दल शिक्षा :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम ६:
माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करुन देण्याचे नाकारल्याबद्दल शिक्षा :
सामान्य व्यवहारक्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्या वेळी व स्थळी आणि ज्या अटींवर व शर्तींवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात त्याच वेळी व स्थळी आणि त्याच अटींवर व शर्तींवर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यते, च्या कारणावरुन असा माल विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करुन देण्याचे जो कोणी, नाकारील तो, १.(एक महिन्याहून कमी नाही आणि सहा महिन्यांहून जास्त नाही इतक्या मुदतीच्या कारावासास व शंभर रुपयांहून कमी नाही, व पाचशेरुपयांहून जास्त असणार नाही अशा द्रव्यदंडासही पात्र होईल. )
——-
१. १९७६ चा अधिनियम क्रमाकं १०६ याच्या कलम ८ द्वारे मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply