Pcr act कलम २: व्याख्या :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम २:
व्याख्या :
या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,
(a)क) १.(अ) नागरी हक्क याचा अर्थ, संविधानाच्या अनुच्छेत १७ द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा आहे;)
(aa)कक) २.(अअ)) हॉटेल या विश्रांतिगृह, भोजनालय, निवासगृह, कॉफीगृह व कॅफे यांचा समावेश आहे;
(b)ख)३.(ब) स्थान यात, घर इमारत आणि अन्य बांधकाम व वास्तू यांचा समावेश आहे; आणि तसेच, त्यात तंबू, वाहन व जलयान यांचाही समावेश आहे;)
(c)ग) (क) सार्वजनिक करमणुकीचे स्थान यात, जेथे जनतेला प्रवेश दिला जातो आणि करमणूक उपलब्ध करुन दिल जाते किंवा करमणूक सादर केली जाते अशा कोणत्याही स्थानाचा समावेश आहे.
स्पष्टीकरण :
करमणूक यात, कोणतेही प्रदर्शन, कार्यक्रम, खेळ क्रीडा व मनोरंजनाचा अन्य कोणताही प्रकार याचा समावेश आहे.
(d)घ)(ड) सार्वजनिक उपासस्थान याचा अर्थ, सार्वजनिक धार्मिक उपासनेचे स्थान म्हणून जे वारले जाते अथवा एखादा धर्म प्रतिज्ञापित करणाऱ्या किंवा कोणत्याही धार्मिक संप्रदायाच्या किंवा त्यातील कोणत्याही शाखेच्या व्यक्तींना जेथे कोणतेही धार्मिक कृत्य करता यावे किंवा प्रार्थना करता यावी यासाठी सर्वसाधारणपणे जे समर्पित केलेले आहे किंवा त्यासाठी त्या व्यक्ती ज्याचा वापर करतात ते स्थान असा आहे- मग ते कोणत्याही नावाने ओळखले जात असो-
४.(आणि त्यात-
(एक) अशा कोणत्याही स्थानाशी अंगभूत असलेल्या अशा सर्व जमिनी व दुय्यम पवित्र स्थाने;
(दोन) खासगी मालकीच्या ज्या उपासनास्थानाचा प्रत्यक्षात सार्वजनिक उपासनास्थान म्हणून वापर करण्यास त्याच्या मालकाने मुभा दिली आहे, असे स्थान; आणि
(तीन) अशा खासगी मालकीच्या उपासनास्थानाशी अंगभूत असलेली अशी जी जमीन किंवा दुय्यम पवित्र स्थान, याचा त्याच्या मालकाने सार्वजनिक धार्मिक उपासनास्थान म्हणून वापर करण्याची मुभा दिली आहे अशी जमीन किंवा पवित्र स्थान,
यांचा समावेश आहे;)
(da)घक) ५.(डअ) विहित याचा अर्थ, या अधिनियमाखाली करण्यात आलेल्या नियमांद्वारे विहित केलेले, असा आहे;
(db)घख) (डब) अनुसूचित जाती याला, संविधानाच्या अनुच्छेद ३६६ च्या खंड (२४) मध्ये त्यास नेमून दिलेला अर्थ आहे;)
(e)ङ) (ई) दुकान याचा अर्थ, जेथे एकतर घाऊक किंवा किरकोळ अथवा घाऊक व किरकोळ अशा दोन्ही प्रकारे माल विकला जातो अशी कोणतीही वास्तू, असा आहे ६.(आणि त्यात पुढील जागांचा समावेश आहे-
(एक) फेरीवाला किंवा विक्रेता याच्याकडून अथवा फिरते वाहन किंवा गाडी यामधून जिथे माल विकला जातो असे स्थान,
(दोन) धुलाईघर आणि केश कर्तनालय,
(तीन) जेथे ग्राहकांना सेवा उपलब्ध करुन दिली जाते असे अन्य कोणतेही स्थान.)
——–
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ४ अन्वये (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ४ अन्वये खंड (अ) यास खंड (अअ) असे नाव (१९-११-१९७६ पासून) देण्यात आले.
३. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ४ अन्वये खंड (ब) याऐवजी (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
४. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ४ अन्वये विवक्षित मजकुराऐवजी (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
५. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ४ अन्वये (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
६. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ४ अन्वये विवक्षित मजकुराऐवजी (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply