Pcpndt act कलम ३ : आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, आनुवंशिकीय प्रयोगशाळा व आनुवंशिकीय चिकित्सालये यांचे विनियमन :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
प्रकरण २ :
आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, आनुवंशिकीय प्रयोगशाळा व आनुवंशिकीय चिकित्सालये यांचे विनियमन :
कलम ३ :
आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, आनुवंशिकीय प्रयोगशाळा व आनुवंशिकीय चिकित्सालये यांचे विनियमन :
या अधिनियमाच्या प्रारंभास व तेव्हापासून,-
१) कोणतेही आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय यांना, या अधिनियमान्वये त्यांची नोंदणी करण्यात आली असल्याखेरीज, प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्राशी संबंधित कार्य करता येणार नाही, किंवा ते करण्यात सहभागी होता येणार नाही किंवा ते करण्यात मदत करता येणार नाही ;
१.(२) कोणतेही आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र किंवा अनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय विहित करता येईल अशी अर्हता धारण न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची नियुक्ती करणार नाही किंवा करण्यास कारणीभूत होणार नाही, मग-ती मानधन तत्वावर असो वा वेतनावर असो;)
३) कोणताही वैद्यकीय अनुवंश शास्त्रज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगचिकित्सक, नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी किंवा कोणतीही अन्य व्यक्ती स्वत: किंवा कोणत्याही अन्य व्यक्तीमार्फत, या अधिनियमाद्वारे नोंदवलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी कोणतीही प्रसव-पूर्व रोगनिदान तत्रे वापरणार नाही किंवा वापरण्यास कारणीभूत किंवा साहाय्यभूत होणार नाही.
———-
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ५ द्वारे मूळ पोट-कलम (२) ऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply