Pca act 1988 Section 31 : [Omission of certain sections of Act 45 of 1860] :

Prevention Of Corruption Act 1988
Section 31 :
[Omission of certain sections of Act 45 of 1860] :
Rep. by the Repealing and Amending Act, 2001(30 of 2001), s.2 and the First Schedule (w.e.f. 3-9-2001).
भ्रष्टाचार निवारण अधिनियम १९८८
धारा ३१ :
१८६० के अधिनियम सं. ४५ की कुछ धाराओं का लोप :
भारतीय दंड संहिता की धारा १६१ से धारा १६५ क तक का (जिसमें ये दोनों धाराएं सम्मिलत हैं ) लोप किया जाएगा, और साधारण खंड अधिनियम, १८९७ (१८९७ का १०) की धारा ६ ऐसे लोप को लागू होंगी, मानो उक्त धाराओं का लोप किसी केंद्रीय अधिनियम द्वारा किया गया हो ।
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम ३१ :
१८६० चा अधिनियम ४५ च्या विवक्षित कलमांची वगळणूक :
भारतीय दंड संहितेची कलमे १६१ ते १६५- अ ( दोन्हीही समाविष्ट) वगळण्यात येतील, आणि सर्वसाधारण परिभाषा अधिनियम, १८९७ (१८९७ चा १०) याचे कलमे ६ हे सदर कलम जणु काही केंद्रीय अधिनियमान्वये निरसित झाले असल्याप्रमाणे अशा वगळणुकीस लागू होईल.
परिशिष्ट अ Appendix
(भारतीय दंड संहिता प्रकरण -नऊ )
लोक सेवकांकडून किंवा त्यांच्यासंबंधी घडणारे अपराध :
कलम १६१:
लोक सेवकाने पदीय कार्याच्या बाबतीत वैध परिश्रमिकाहून अन्य परितोषण घेणे :
(भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सन १९८८ चा अधिनियम क्र.४९) द्वारे निरसित )
कलम १६२:
लोक सेवकावर प्रभाव पाडण्यासाठी भ्रष्ट किंवा अवैध मार्गाने परितोषण घेणे : (भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सन १९८८ चा अधिनियम क्र.४९) द्वारे निरसित )
कलम १६३:
सरकारी नोकरास भीड घालण्याबद्दल देणगी घेणे : (भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सन १९८८ चा अधिनियम क्र.४९) द्वारे निरसित )
कलम १६४:
कलम १६२ किंवा १६३ मध्ये व्याख्या केलेल्या अपराधांस लोक सेवकाने अपप्रेरणा दिल्याबद्दल शिक्षा : लगतपूर्वीच्या दोन कलमात व्याख्या केलेल्यापैकी कोणतातरी अपराध ज्याच्या संबंधात करण्यात आला आहे असा लोकसेवक असून जो कोणी त्या अपराधाला अपप्रेरणा देईल त्यास, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
कलम १६५:
लोक सेवकाने केलेल्या कार्यवाहित किंवा व्यवहारात निबध्द असलेल्या व्यक्तीकडून अशा लोक सेवकाने प्रतिफलाविना मूल्यवान वस्तु मिळवणे : जो कोणी लोक सेवक असून, त्याने जी कोणतीही कार्यवाही किंवा व्यवहार केला आहे किंवा तसे करण्याच्या बेतात आहे तो आहे त्यात जी व्यक्ती निबध्द होती किंवा आहे किंवा होण्याचा संभव आहे हे त्यास माहित असेल,
अथवा, त्याच्या स्वत:च्या किंवा तो ज्यास दुय्यम आहे अशा कोणत्याही लोक सेवकाच्या पदीय कार्याधिकारांशी जिचा संबंध असेल,
अथवा, याप्रमाणे निबध्द असलेल्या व्यक्तीशी जी कोणतीही व्यक्ती हितसंबंधीत किंवा तिच्या नात्याची असल्याचे त्यास माहित असेल,
तिच्याकडून कोणतीही मूल्यवान वस्तू प्रतिफलाविना किंवा जे अपर्याप्त असल्याचे त्यास माहित आहे अशा प्रतिफलादाखल स्वत: करता किंवा कोणत्याही व्यक्तीकरता स्वीकारील किंवा मिळवील अथवा स्वीकारण्याचे कबूल करील किंवा मिळवण्याचा प्रयत्न करील.
त्यास तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
कलम १६५-क:
कलम १६१ किंवा कलम १६५ मध्ये व्याख्या केलेल्या अपराधांना अपप्रेरणश देण्याबद्दल शिक्षा : कलम १६१ किंवा कलम १६५ खाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधास जो कोणी अपप्रेरणा देईल त्यास- मग त्या अपप्रेरणाचा परिणाम म्हणून अपराध घडो वा न घडो – तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
कलम १६६:
कोणत्याही व्यक्तीला क्षती पोचवण्याच्या उद्देशाने लोक सेवकाने कायद्याची अवज्ञा करणे : जर कोणी लोक सेवक असून असा लोक सेवक म्हणून त्याने स्वत: कशा प्रकारे आचरण करावे याबाबतच्या कोणत्याही विधि निदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा केली असेल आणि अशा अवज्ञेमुळे कोणत्याही व्यक्तीला क्षती पोचवणे त्याला उद्देशित असेल किंवा तसे होण्यास आपण कारण होऊ याची त्यास जाणीव असेल तर, त्याला एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
कलम १६७:
क्षती पोचवण्याच्या उद्देशाने लोक सेवकाने चुकीच्या दस्तऐवजाची मांडणी करणे : जर कोणी लोक सेवक असून आणि असा लोक सेवक म्हणून कोणताही दस्तऐवज तयार करण्याची किंवा त्याचा अनुवाद करण्याची जबाबदारी त्याच्यावर असून, जी रीत चुकीची असल्याचे त्याला माहित आहे किंवा तसे तो समजतो तशा रीतीने त्या दस्तऐवजाची मांडणी करील किंवा त्याचा अनुवाद करील आणि त्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला क्षती पोचावी असा त्याचा उद्देश असेल किंवा तशी क्षती त्यामुळे आपणांकडून पोचवणे संभवनीय असल्याची त्याला जाणीव असेल तर, त्यास तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एक वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
कलम १६८:
लोक सेवकाने बेकायदेशीरपणे व्यापारधंदा करणे : जो कोणी लोकसेवक असून आणि असा लोकसेवक म्हणून व्यापारधंदा न करण्यास तो विधित: बध्द असताना व्यापारधंदा करील त्यास एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
कलम १६९:
लोक सेवकाने बेकायदेशीरपणे मालमत्ता विकत घेणे किंवा ती साठी बोली देणे : जो कोणी लोक सेवक असून आणि असा लोक सेवक म्हणून विवक्षित मालमत्ता खरेदी न करण्यास किंवा ती साठी बोली न देण्यास विधित: बध्द असून, स्वत:च्या नावाने किंवा अन्य व्यक्तीच्या नावाने अथवा इतरांसह संयुक्तपणे किंवा भागीत ती खरेदी करील किंवा ती साठी बोली देईल त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील, आणि मालमत्ता खरेदी केल्यास असल्यास ती अधिहरण केली जाईल.
कलम १७०:
लोक सेवकाची बतावणी करून तोतयेगिरी करणे : जो कोणी आपण लोक सेवक म्हणून कोणतेही विशिष्ट अधिकारपद धारण करत नाही हे माहित असतांना असे अधिकारपद धारण करण्याचा बहाणा करील अथवा असे अधिकारपद धारण करणाऱ्या अन्य कोणत्याही व्यक्तीची बतावणी करून तोतयेगिरी करील आणि अशा बनावट भूमिकेत असतांना अशा पदाधिकाराच्या मिषाने कोणतीही कृती करील किंवा करण्याचा प्रयत्न करील त्यास दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
कलम १७१:
लोक सेवक वापरतो तशी वर्दी किंवा तसे ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे किंवा जवळ बाळगणे : स्वत: लोक सेवकाच्या विवक्षित वर्गापैकी नसताना, आपण लोकसेवकाच्या त्या वर्गापैकी नसताना, आपण लोक सेवकाच्या त्या वर्गापैकी आहोत असा समज व्हावा या उद्देशाने किंवा तसा समज होणे संभवनीय आहे याची जाणीव असून जो कोणी त्या वर्गातील लोक सेवक वापरतात तशासारखी वर्दी परिधान करील किंवा तशासारखे ओळखचिन्ह जवळ बाळगील त्याला तीन महिनेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply