Pca act 1988 कलम ९ : वाणिज्यिक (व्यावसायिक) संगठन द्वारा लोक सेवकाला लाच देण्यासंबंधित अपराध :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम ९ :
१.(वाणिज्यिक (व्यावसायिक) संगठन द्वारा लोक सेवकाला लाच देण्यासंबंधित अपराध :
जिथे या अधिनियमा अंतर्गत अपराध हा वाणिज्यिक संगठन द्वारा केला असेल, अशा व्यावसायिक संगठनेशी संबंधित असलेला कोणताही व्यक्ती लोकसेवकाला निम्नलिखित आशयासाठी अनुचित लाभ देतो किंवा देण्याचे वचन देतो तर, असे संगठन द्रव्यदंडास पात्र होईल, –
क) अशा वाणिज्यिक संगठनेसाठी व्यवसाय प्राप्त करणे किंवा राखणे; किंवा
ख) अशा वाणिज्यिक संगठनेसाठी व्यवसाय चालवताना फायदा मिळविणे किंवा टिकवून ठेवणे :
परंतु असे की, वाणिज्यिक संगठन करीता, असे वर्तन करण्यापासून संबंधित व्यक्तींना प्रतिबंधित करण्यासाठी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासाठी पुरेशा कार्यपद्धतीं अवलंबिल्या होत्या हे सिद्ध करण्यासाठी, संरक्षण असेल.
२) या कलमाच्या प्रयोजनासाठी, एखाद्या व्यक्तीने लोकसेवकाला अनुचित लाभ दिला आहे किंवा देण्याचे वचन दिले असे तेव्हा म्हणले जाईल जेव्हा , त्या व्यक्तीने कलम ८ अन्वये अपराध केला आहे, अशा व्यक्तीस अशा गुन्हासाठी खटला चालावला गेला आहे किवा नाही.
३) कलम ८ आणि या कलमाच्या प्रयोजनासाठी –
क) वाणिज्यिक संगठन या मध्ये निम्नलिखित अभिप्रते आहे –
एक) अशी कोणतीही संस्था किंवा कंपनी, जी भारतामध्ये निगमित (मान्यता प्राप्त) आहे आणि जी भारतात व भारताबाहेर व्यवसाय करते.
दोन) अशी कोणतीही संस्था किंवा कंपनी, जी भारताबाहेर निगमित (मान्यता प्राप्त) आहे आणि जी भारतातील कोणत्याही भागात व्यवसाय qकवा व्यवसायाचा काही भाग करते.
तीन) अशी कोणतीही भागिदारी संस्था (फर्म) किंवा व्यक्तींचा समुह, जो भारतात बनविला असेल आणि भारतात व भारताबाहेर व्यवसाय करतो.
चार) अशी कोणतीही भागिदारी संस्था (फर्म) किंवा व्यक्तींचा समुह, जो भारताबाहेर बनविला असेल आणि भारतातील कोणत्याही भागात व्यवसाय करतो किंवा व्यवसायाचा काही भाग करतो.
ख) व्यवसायामध्ये व्यापार किंवा धंदा किंवा सेवा प्रदान करणे समाविष्ट आहे;
ग) एखाद्या व्यक्तीला व्यावसायिक संगठनेशी संबंधित असल्याचे तेव्हाच म्हटले जाईल, जेव्हा अशा व्यक्तीने पोटकलम (१) अन्वये अपराध ठरणारा अनुचित लाभ देण्याचे वचन दिले जाने व असा लाभ दिल जाण्याकडे लक्ष न देता वाणिज्यिक संगठनेसाठी किंवा त्याच्या वतीने कोणतीही सेवा प्रदान केली.
स्पष्टीकरण १ :
जी व्यक्ती ज्या क्षमतेने वाणिज्यिक संगठनेसाठी किंवा तिच्या वतीने सेवा करते ती व्यक्ती अशा वाणिज्यिक संगठनेची कर्मचारी किंवा एजंट किंवा सहकंपनी असली तरीही काही फरक पडत नाही.
स्पष्टीकरण २ :
ती व्यक्ती व्यावसायिक संगठनेसाठी किंवा तिच्या वतीने सेवा करणारी व्यक्ती आहे की नाही हे सर्व संबंधित परिस्थितींच्या संदर्भात ठरवले जावे आणि केवळ अशा व्यक्ती आणि व्यावसायिक संस्था यांच्यातील नातेसंबंधाच्या स्वरूपाच्या संदर्भात नाही.
स्पष्टीकरण ३ :
जर ती व्यक्ती व्यावसायिक संगठनेची कर्मचारी असेल, तर ती व्यक्ती व्यावसायिक संगठनेसाठी किंवा तिच्या वतीने सेवा बजावणारी व्यक्ती आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत असे मानले जाईल.
४) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कलम ७क व कलम ८ खालील अपराध हे दखलपात्र असतील.
५) केन्द्र सरकार, विभांगासह संबंधित शेअर धारकांशी सल्लामसलत करुन आणि वाणिज्यिक संगठनेशी संबंधित व्यक्तीं द्वारा कोणत्याही व्यक्तीला, जो लोकसेवक असेल, लाच देण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी, आवश्यक वाटतील अशी मार्गदर्शक तत्वे विहित करील, जी आवश्यक समजली जातील व संगठनांद्वारे अनुपालन हेतू स्थापित केली जातील.)
——–
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ४ अन्वये कलम ७, ८, ९, १० ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply