भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम १२ :
१.(अपराधांना प्रोत्साहन देण्याबद्दल शिक्षा :
जो कोणी, या अधिनियमाच्या अधीन दंडनीय अपराधाचे दुष्प्रेरण (अपप्रेरण) करील, अशा वेळी या दुष्प्रेरणाच्या (अपप्रेरण) परिणामस्वरुप अपराध घडला किंवा नाही तरी, तो कमीत कमी तीन वर्षापर्यंत असू शकेल परंतु जी सात वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासास व द्रव्यदंडासही पात्र होईल.)
———–
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ६ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
यापूर्वी
कलम १२ :
कलम ७ किंवा ११ मध्ये व्याख्या केलेल्या अपराधांना प्रोत्साहन देण्याबद्दल शिक्षा :
कलम ७ किंवा कलम ११ या अन्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधास, जी कोणतीही व्यक्ती प्रोत्साहन देईल ती, मग असा अपराध अशा प्रोत्साहनाच्या परिणामस्वरूप घडलेला असो अथवा नसो- सहा महिन्यांपेक्षा कमी नसलेल्या, परंतु ज्यात पाच वर्षांपर्यंत वाढ करता येईल एवढया मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस तसेच द्रव्यदंडासही पात्र ठरेल.