प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
प्रकरण ३ :
प्राण्यांना क्रूरतेने वागविणे :
कलम ११ :
प्राण्यांना क्रूरतेने वागविणे :
(१) कोणतीही व्यक्ती,
(a)(क)(अ) कोणत्याही प्राण्याला मारील, लाथेने मारील, त्याच्यावर अधिक भार लादेल, त्याला अधिक दामटेल, त्याच्यावर क्षमतेपेक्षा जास्त वजन ठेवील, त्याचा छळ करील किंवा जेणेकरून त्या प्राण्याला उगीचच वेदना व यातना होतील अशा प्रकारे वागवील तर; किंवा
(b)(ख)(ब) १.(ज्याचे वय झाल्यामुळे किंवा कोणत्याही रोगामुळे) विकलतेमुळे, जखमी झाल्यामुळे, दुखापत झाल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असे काम करण्यास जो प्राणी, अयोग्य, ठरला असेल अशा १.(कोणत्याही प्राण्याकडून कोणतेही काम, मेहनत किंवा अन्य कोणत्याही गोष्टी करून घेईल) किंवा मालक म्हणून अशा प्राण्याला कामाला लावण्याची परवानगी देईल तर; किंवा
(c)(ग) (क) २.(कोणत्याही प्राण्याला) बुद्धिपुरस्सर आणि गैरवाजवीपणे कोणतेही क्षतिकारक औषधिद्रव्य किंवा क्षतिकारक पदार्थ देईल किंवा २.(कोणत्याही प्राण्याला) बुद्धिपुरस्सर आणि गैरवाजवीपणे किंवा कोणतेही औषधिद्रव्य किंवा पदार्थ (पोटात) घ्यायला लावील किंवा घ्यायला लावण्याची प्रयत्न करील; किंवा
३.(ग१)(क१) सांस्कृतिक व पारंपारिक प्रथा चालू ठेवण्याच्या आणि त्यांना चालना देण्याच्या आणि बैलांच्या मूळ प्रजातींचे संवर्धन, तसेच, त्यांची शुद्धता, सुरक्षा, सुरक्षितता आणि स्वास्थ्य सुनिश्चित करण्याच्या हेतूने, कलम ३ च्या पोटकलम (२) या तरतुदींनुसार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणे आणि त्यामध्ये सहभागी होणे; किंवा)
(d)(घ)(ड) कोणत्याही प्राण्याला ज्यामुळे त्याला उगाचच वेदना किंवा यातना होतील अशा रीतीने किंवा अशा स्थितीत मग त्याला कोणत्याही वाहनातून किंवा वाहनावर घालून आणलेले असो वा नसो वाहून आणील किंवा नेईल; किंवा
(e)(ङ)(इ) कोणत्याही प्राण्याला ज्यात प्राण्याला उंचीच्या, रूंदीच्या आणि जाडीच्या मानाने पुरेसे नसल्यामुळे वाजवीरीत्या हालचाल करता येणार नाही अशा कोणत्याही qपजऱ्यात किंवा पात्रात ठेवील किंवा परिरूद्ध करील; किंवा
(f)(च) (फकोणत्याही पशूला गैरवाजवीपणे आखूड किंवा गैरवाजवीपणे जड असलेल्या साखळीने किंवा दोराने, गैरवाजवी कालावधीसाठी बांधून ठेवील; किंवा
(g)(छ) (ग) मालक म्हणून कोणत्याही कुत्र्याला नेहमी साखळीने बांधून ठेवून किंवा बंदिवासात ठेवण्याची व्यवस्था करून त्याच्याकडून वाजवीरीत्या कसरती करून घेण्याकडे किंवा त्याची कसरत करण्याची व्यवस्था करण्याकडे, ती दुर्लक्ष करील; किंवा
(h)(ज) (ह)२.(कोणत्याही प्राण्याचा) मालक म्हणून त्या प्राण्याला पुरेसे अन्न, पाणी किंवा निवारा देण्यास ती चुकेल; किंवा
(i)(झ)(आय) कोणत्याही प्राण्याची वाजवी कारणाशिवाय उपासमारी किंवा तहानेने व्याकूळ होण्याची शक्यता असेल अशा परिस्थितीत तसेच सोडून देईल; किंवा
(j)(ञ)(जे) ज्याचा ती मालक आहे अशा कोणत्याही प्राण्याला तो प्राणी सांसर्गिक किंवा संक्रामक आजाराने पीडित असताना कोणत्याही हमरस्त्यावर कोठेही बुद्धिपुरस्सर जाऊ देईल किंवा ज्या अशा कोणत्याही रोगी किंवा विकलांग प्राण्याचा ती मालक आहे, त्याला वाजवी कारणाशिवाय, कोणत्याही रस्त्यावर मरण्यासाठी सोडून देईल; किंवा
(k)(ट)(के) ज्याचा अवयव छाटल्यामुळे, भूक, तहान, अतिगर्दी किंवा इतर दुव्र्यव्यवहार यामुळे किंवा इतर प्रकारे जाच केल्यामुळे तो वेदनेने पीडित झाला आहे, असा तिच्या ताब्यात असणारा कोणताही प्राणी विकेल किंवा वाजवी कारणाशिवाय तो विकण्यासाठी काढेल; किंवा
(l)४.(ठ)(एल) कोणत्याही प्राण्याची यात बेवारशी कुत्री अंतर्भूत असतील. त्याच्या हृदयात, स्टड्ढायचीन इंजेक्शन टोचण्याच्या पद्धतीने किंवा उगीचच इतर कोणतीही निर्दयतेची पद्धत वापरून अवयव छाटील किंवा कोणत्याही प्राण्याला मारून टाकील; किंवा)
(m)५.(ड)(एम) केवळ करमणुकीकरिता –
(एक) कोणत्याही प्राण्याला जेणेकरून तो अन्य कोणत्याही प्राण्याचे भक्ष्य बनेल, (यात अभयारण्यात वाघाचे किंवा अन्य प्राण्याचे भक्ष्य म्हणून बांधलेल्या पशूचा अंतर्भाव असेल) अशाप्रकारे परिरूद्ध करून ठेवील किंवा परिरूद्ध करवील; किंवा
(दोन) कोणत्याही प्राण्याला अन्य कोणत्याही प्राण्याशी झुंज देण्याकरिता किंवा त्याला लालूच दाखविण्याकरिता चिथावणी देईल; किंवा)
(n)(ढ) (एन) ६.(***) प्राण्यांची झुंज लावण्यासाठी किंवा कोणत्याही प्राण्याला लालूच तिची व्यवस्था ठेवण्याची कृती करील किंवा कोणत्याही जागेचा असा उपयोग करण्यासाठी परवानगी देईल किंवा ती तशा उपयोगासाठी देऊ करील किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला अशा कोणत्याही प्रयोजनासाठी कोणतीही जागा ठेवण्यास किंवा तिचा उपयोग करण्यास परवानगी देऊन पैसे मिळवील; किंवा
(o)(ण)(ओ) ज्या नेमबाजीच्या सामन्यामध्ये किंवा स्पर्धेत ज्यात असा नेम धरण्यासाठी प्राण्यांना बंदिवासातून मुक्त करण्यात येत असेल, त्या सामन्यांना किंवा स्पर्धांना प्रोत्साहन देईल; किंवा त्यात भाग घेईल,
तर ती, ७.(पहिल्या अपराधाच्याबाबतीत, दहा रूपयांहून कमी नसणाऱ्या, परंतु पन्नास रूपयांपर्यंत असू शकणाऱ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि पूर्वीचा अपराध घडल्यापासून तीन वर्षांच्या आत करण्यात आलेल्या दुसऱ्या किंवा तद्नंतर केलेल्या अपराधाच्या बाबतीत पंचवीस रूपयांहून कमी नसणाऱ्या, परंतु शंभर रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा तीन महिन्यांपर्यंत असू शकेल एवढ्या कारावासाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.)
(२) पोटकलम (१) च्या प्रयोजनार्थ, एखादा मालक, अशा अपराधाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने वाजवी काळजी घेण्यास आणि त्याच्यावर देखरेख करण्यास चुकेल तर, त्याने अपराध केला असल्याचे मानण्यात येईल :
परंतु, अशी काळजी घेण्यास किंवा देखरेख ठेवण्यास चुकल्याच्या केवळ कारणावरून त्याने क्रूरता दाखवण्यास परवानगी दिल्याबद्दल मालक सिद्धदोषी ठरला असेल त्याबाबतीत, त्याला द्रव्यदंडाचा विकल्प दिल्याखेरीज, कारावासाच्या शिक्षेस तो पात्र ठरणार नाही.
(३) या कलमातील कोणताही मजकूर –
(a)(क)(अ) विहित करण्यात आलेल्या रीतीने गुरांची qशगे उपटणे किंवा कोणत्याही प्राण्योचे खच्चीकरण करणे किंवा डाग देणे किंवा त्याच्या नाकात वेसण घालणे; किंवा
(b)(ख)(ब) बेवारशी कुत्र्याला प्राणहारक कक्षात कोंडून किंवा ७.(विहित करण्यात येईल अशा इतर पद्धतीने) त्यांचा नाश करणे; किंवा
(c)(ग) (क) त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या प्राधिकारान्वये, कोणत्याही प्राण्याचा निर्वंश करणे किंवा त्याचा नाश करणे; किंवा
(d)(घ) (ड) चौथ्या प्रकरणामधील कोणतीही बाब हाताळणे; किंवा
(e)(ङ)(इ) मानवजातीचे अन्न म्हणून कोणत्याही प्राण्याचा नाश करताना किंवा नाश करण्याची तयारी करताना प्राण्याला उगीचच यातना किंवा वेदना न देता असा नाश करणे किंवा तो करण्याचा प्रयत्न करणे,
या गोष्टींना लागू असणार नाही.
——–
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १० द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १० द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१७ चा अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम ४ द्वारा समाविष्ट करण्यात आले.
४. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १० द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १० द्वारा मूळ खंडाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १० द्वारा मूळ मजकूर वगळण्यात आला.
७. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १० द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
