प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६०(१९६० चा ५९)
(३० मार्च २००१ रोजी यथाविद्यमान)
प्रस्तावना :
प्रकरण १ :
प्रारंभिक
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
प्राण्यांना उगीचच वेदना किंवा यातना देण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्या प्रयोजनार्थ प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याशी संबंधित कायद्याचे विशोधन करण्यासाठी अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या अकराव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
————
(१) या अधिनियमास प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० असे म्हणता येईल.
(२) त्याचा विस्तार १.(***) संपूर्ण भारतभर आहे.
(३) केंद्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करील अशा २.(दिनांकास) तो अंमलात येईल व वेगवेगळ्या राज्यासाठी आणि या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या वेगवेगळ्या उपबंधांसाठी वेगवेगळे दिनांक नियम करता येतील.
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ९५ व अनुसूची पाच अन्वये जम्मू व काश्मीर राज्य खेरीजकरून हा मजकूर वगळण्यात आला.
२. दिनांका साठी इंग्रजी पहा.
