प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ३ :
प्राण्यांचा प्रभार असणाऱ्या व्यक्तींची कर्तव्ये :
१.(१) कोणत्याही प्राण्याची देखभाल करणाऱ्या किंवा त्याचा प्रभार असणाऱ्या व्यक्तीचे, असे प्राणी सुस्थितीत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व वाजवी उपाय योजणे आणि अशा प्राण्याला उगीचच होणाऱ्या वेदना किंवा यातना देण्यास प्रतिबंध करणे, हे कर्तव्य असेल.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, बैलगाडक्ष शर्यत आयोजित करण्यासाठी वापरण्यात येणाèया प्राण्याला कोणत्याही व्यक्तीकडून, किंवा त्याचा प्रभार असणाèया व्यक्तीकडून कोणतीही वेदना किंवा यातना दिली जाणार नाही, या शर्तीस आणि कलम ३८ख खालील नियमांद्वारे विहित करण्यात येतील अशा अन्य शर्तींना अधीन राहून, जिल्हाधिकाèयाच्या पूर्व परवानगीने बैलगाडी शर्यत आयोजित करता येईल
३) जी कोणतीही व्यक्ती किंवा बैलगाडी शर्यतीच्या आयोजनातील प्राण्यांचा ताबा असणारी व्यक्ती पोटकलम (२) मध्ये निर्धारित केलेल्या शर्तींचे किंवा बैलगाडी शर्यतीसंबंधी त्याखाली केलेल्या नियमांचे उल्लंघन करील किंवा त्या प्राण्यांना वेदना किंवा यातना देईल, ती व्यक्ती, पाच लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या किंवा तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र होईल.)
——–
१. २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम ३ द्वारे कलम ३ ला त्याचे पोटकलम (१) असा नवीन क्रमांक देण्यात आला आणि पोटकलम (१) नंतर पोटकलम (२) व (३) समाविष्ट करण्यात आले.