प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ३१ :
अपराधांची दखलपात्रता :
१.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ (१८९८ चा ५) (आता १९७४ चा २)) यात काहीही अंतर्भूत असेल तरी कलम ११ च्या पोटकलम (१) च्या खंड (ठ) किंवा खंड (ट) किंवा खंड (ण) अन्वये किंवा कलम १२ अन्वये शिक्षापात्र असणारा एखादा अपराध त्या संहितेच्या अर्थांतर्गत दखलपात्र अपराध असेल.
———
१.आता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ पहा.