प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ३० :
विवक्षित प्रकरणी दोषी असण्याचे गृहीतक :
कोणत्याही व्यक्तीवर, तिने कलम ११, पोटकलम (१) खंड (झ) च्या उपबंधाविरूद्ध एखाद्या बोकडाला किंवा गाईला किंवा तिच्या प्रजनिताला ठार केले असल्याचा दोषारोप ठेवण्यात आला असेल आणि अपराध करण्यात आला असल्याचे अभिकथित असेल त्यावेळी, या कलमात निर्देशित केलेली अशा कोणत्याही प्राण्याची कातडी, आणि डोक्याला लागून असलेल्या कातडीचा कोणताही भाग त्या व्यक्तीच्या ताब्यात असेल तर, अशा प्राण्याला कू्ररतेने ठार मारण्यात आले होते याविरूद्ध काहीही सिद्ध होईतोपर्यंत तसे गृहीत धरण्यात येईल.