प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम २७ :
सूट :
या प्रकरणात अंतर्भूत असणारी कोणतीही गोष्ट, –
(a)(क)(अ) खऱ्याखुऱ्या सैनिकी किंवा पोलिसी प्रयोजनासाठी प्राण्यांना प्रशिक्षण देण्यास किंवा असे प्रशिक्षण देण्यात आलेल्या कोणत्याही प्राण्याचे प्रदर्शन करण्यास; किंवा
(a1)१.(क-१)(अ१) सांस्कृतिक व पारंपारिक प्रथा चालू ठेवण्याच्या आणि त्यास चालना देण्याच्या हेतूने, कलम ३ च्या पोट-कलम (२) च्या तरतुदींनुसार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणे आणि बैलांच्या मूळ प्रजाती टिकवून ठेवण्याची व त्या अबाधित राखण्याची सुनिश्चिती करणे; किंवा)
(b)(ख)(ब) प्राणी उद्यानामध्ये ठेवलेल्या किंवा तिचा मुख्य उद्देश शैक्षणिक किंवा शास्त्रीय प्रयोजनांसाठी प्राण्यांचे प्रदर्शन करणे, असा आहे, अशा सोसायटी किंवा अधिसंघाने ठेवलेल्या कोणत्याही प्राण्यास,-
लागू होणार नाही.
——–
१. २०१७ चा अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम ६ द्वारा समाविष्ट करण्यात आले.