प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम २६ :
अपराध :
कोणतीही व्यक्ती, –
(a)(क)(अ) या प्रकरणाखाली नोंदणीकृत नसून खेळ करणाऱ्या कोणत्याही प्राण्याचे प्रदर्शन करत असेल किंवा त्याला प्रशिक्षण देत असेल; किंवा
(b)(ख)(ब) या अधिनियमाखाली नोंदणीकृत असून, ज्याच्या बाबतीत किंवा ज्या पद्धतीने खेळ करून दाखवणाऱ्या प्राण्याचे प्रदर्शन करीत असेल किंवा त्याला प्रशिक्षण देत असेल तो प्राणी किंवा ती पद्धत यांच्या संंबंधात ती नोंदणीकृत नसेल; किंवा
(c)(ग)(क) कलम २२, खंड (दोन) अन्वये काढण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे, खेळ करून दाखवण्याच्या प्रयोजनार्थ वापरता येऊ न शकणाऱ्या कोणत्याही प्राण्यांचे प्रदर्शन करीत असेल किंवा त्याला प्रशिक्षण देत असेल; किंवा
(d)(घ)(ड) कलम २५ मध्ये निर्देशिलेली कोणतीही व्यक्ती किंवा पोलीस अधिकारी, या अधिनियमाखालील प्रवेश व निरीक्षण करण्याच्या शक्तींचा वापर करीत असताना, त्या व्यक्तीला किंवा पोलीस अधिकाऱ्याला अडथळा आणील किंवा बुद्धिपुरस्सर उशीर करील तर; किंवा
(e)(ङ)(इ) असे निरीक्षण टाळण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्राण्याला दडवून ठेवील; किंवा
(f)(च)(फ) या अधिनियमाखाली नोंदणीकृत असून, या अधिनियमाला अनुसरून, त्याचे या अधिनियमाखालील प्रमाणपत्र हजर करणे आवश्यक असेल तेव्हा तसे करण्यास कोणतीही वाजवी सबब असल्याशिवाय चुकेल; किंवा
(g)(छ)(ग) अशी नोंदणी करण्यास तो हक्कदार असेल, तेव्हा या अधिनियमाखाली नोंदणी करण्यासाठी अर्ज करील,
-तर ती व्यक्ती तिच्या दोषसिद्धीनंतर पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या किंवा तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाच्या किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.