प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम १९ :
प्राण्यांवर प्रयोग करण्यास मनाई करण्याची शक्ती :
कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा अन्य व्यक्तीने कलम १८ अन्वये केलेल्या किंवा अन्यथा केलेल्या कोणत्याही निरीक्षणाचे निष्कर्ष कळविल्यावरून समितीची अशी खात्री झाली की, प्राण्यांवर प्रयोग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून कलम १७ अन्वये केलेल्या नियमांचे अनुपालन केले जात नाही, तर समिती, त्याबाबतीत कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊन विनिर्दिष्ट किंवा अनिश्चित कालावधीकरिता असे कोणतेही प्रयोग करणे चालू ठेवण्यास आदेशाद्वारे मनाई करू शकेल किंवा समितीला त्याच्यावर लादणे योग्य वाटतील अशा शर्तींच्या अधीनतेने, व्यक्तीला किंवा संस्थेला असे प्रयोग करणे चालू ठेवण्यास परवानगी देऊ शकेल.