प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम १८ :
प्रवेश आणि तपासणी करण्याची शक्ती :
समिती तिने केलेल्या नियमांचे अनुपालन करण्यात येत आहे हे सुनिश्चित करण्याच्या प्रयोजनार्थ तिच्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला जेथे प्रयोग करण्यात येत असतील अशा कोणत्याही संस्थेचे किंवा जागेचे निरीक्षण करण्यासाठी आणि अशा निरीक्षणाचा निष्कर्ष कळवण्यासाठी लेखी प्राधिकृत करू शकेल आणि अशा रीतीने प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती, –
(a)(क)(अ) तिला योग्य वाटेल अशा कोणत्याही वेळी आणि ज्या कोणत्याही संस्थेमध्ये किंवा जागेत प्राण्यांवर प्रयोग करण्यात येत असतील अशा ठिकाणी प्रवेश करू शकेल आणि तिचे निरीक्षण करू शकेल; आणि
(b)(ख)(ब) तिला आवश्यक वाटेल तर, कोणत्याही व्यक्तीला त्याच्याजवळ प्राण्यांवरील प्रयोगासंबंधी असणारी कोणतीही नोंद हजर करण्यास फर्मावू शकेल.