प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम १६ :
समितीचा कर्मचारीवर्ग :
समिती केंद्र सरकारच्या नियंत्रणाच्या अधीनतेने तिला आपल्या शक्तींचा वापर करणे आणि कर्तव्यांचे पालन करणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक असतील तितके अधिकारी आणि अन्य कर्मचारी यांची नियुक्ती करू शकेल आणि अशा अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे पारिश्रमिक आणि अन्य अटी व सेवा शर्ती निर्धारित करू शकेल.