Pca act 1960 कलम १५ : प्राण्यांवरील प्रयोग करण्यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याकरिता समिती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम १५ :
प्राण्यांवरील प्रयोग करण्यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याकरिता समिती :
(१) मंडळाच्या सल्ल्यावरून कोणत्याही वेळी प्राण्यांवरील प्रयोग करणाऱ्यांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसे करणे आवश्यक आहे असे केंद्र सरकारचे मत असेल तर, ते शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्याला नियुक्त करणे योग्य वाटेल तितक्या शासकीय आणि अशासकीय व्यक्तींचा समावेश असणारी एक समिती घटित करू शकेल.
(२) केंद्र सरकार, समितीच्या सदस्यांपैकी एका व्यक्तीला नामनिर्देशित करील.
(३) समितीला तिचे कर्तव्य बजावण्यासंबंधीच्या तिच्या स्वत:च्या कार्यपद्धतीने विनियमन करण्याची शक्ती असेल.
(४) समितीच्या निधीमध्ये शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा आणि कोणत्याही व्यक्तीकडून दिले जाणारे अंशदान, देणग्या, अभिदान, मृत्युपत्रित देणग्या, दान आणि तत्सम गोष्टी यांचा समावेश असेल.

Leave a Reply