पारपत्र अधिनियम १९६७
कलम ४ :
पासपोर्ट व प्रवासपत्र यांचे वर्ग :
(१) या अधिनियमाखाली पुढील वर्गाचे पासपोर्ट देता येतील, ते म्हणजे –
(a)(क)(अ) सामान्य पासपोर्ट;
(b)(ख)(ब) सरकारी पासपोर्ट;
(c)(ग) (क)राजदौतिक पासपोर्ट
(२) या अधिनियमाखाली पुढील वर्गाची प्रवासपत्रे देता येतील, ती म्हणजे –
(a)(क)(अ) आकस्मिक निकडीच्या प्रसंगी एखाद्या व्यक्तीला भारतात प्रवेश करण्यास प्राधिकृत करणारे प्रमाणपत्र;
(b)(ख)(ब) एखाद्या व्यक्तीची ओळख पटविण्याच्या प्रयोजनासाठी ओळख प्रमाणपत्र;
(c)(ग) (क)विहित करण्यात येईल असे अन्य प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज ;
(३) केंद्र शासन, याबाबतीत त्याने स्वत: अनुसरलेला परिपाठ व शिरस्ता यानुसार, अनुक्रमे पोटकलम (१) व पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या वर्गाचे पासपोर्ट आणि प्रवासपत्रे ज्यांना या अधिनियमान्वये देता येतील, अशा व्यक्तींचे वर्ग विहित करील.