पारपत्र अधिनियम १९६७
कलम ३ :
भारताबाहेर प्रयाण करण्यासाठी पासपोर्ट किंवा प्रवासपत्र :
कोणत्याही व्यक्तीला प्रयाण करण्याबाबतचा विधिग्राह्य पासपोर्ट किंवा प्रवासपत्र धारण केल्याखेरीज भारताबाहेर प्रयाण करता येणार नाही किंवा तसे प्रयाण करण्याचा प्रयत्न करता येणार नाही
स्पष्टीकरण :
या कलमांच्या प्रयोजनांसाठी –
(a)(क)(अ) पासपोर्ट यात विदेशी शासनाने किंवा त्याच्या प्राधिकारान्वये दिलेला जो पासपोर्ट, तो ज्या वर्गापैकी असेल त्या पासपोर्ट वर्गासंबंधी, पासपोर्ट (भारतामध्ये प्रवेश) अधिनियम, १९२० (१९२० चा ३४) यान्वये विहित केलेल्या शर्ती पूर्ण करतो, अशा पासपोर्टाचाही समावेश आहे;
(b)(ख)(ब) प्रवासपत्र यात, विदेशी शासनाने किंवा त्याच्या प्राधिकारान्वये दिलेले जे प्रवासपत्र विहित शर्ती पूर्ण करते, अशा प्रवासपत्राचाही समावेश आहे.