Passports act कलम २: व्याख्या :

पारपत्र अधिनियम १९६७
कलम २:
व्याख्या :
या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, –
(a)(क)(अ) प्रयाण या शब्दाचे व्याकरणिक रूपभेद आणि सजातीय शब्दप्रयोग यांसुद्धा त्याचा अर्थ जलमार्गे, खुष्कीमार्गे किंवा हवाईमार्गे भारताबाहेर प्रयाण करणे, असा आहे.
(b)(ख)(ब) पासपोर्ट याचा अर्थ, या अधिनियमान्वये दिलेला किंवा दिला गेल्याचे मानण्यात येणारा पासपोर्ट, असा आहे;
(c)(ग) (कपासपोर्ट प्राधिकारी/प्राधिकरण याचा अर्थ, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्याबाबत या अधिनियमाखाली केलेल्या नियमांनुसार ज्याला शक्ती प्रदान करण्यात आल्या आहेत, असा अधिकारी किंवा असे प्राधिकरण, असा आहे; आणि यात केंद्र शासनाचा समावेश आहे;
(d)(घ) (ड)विहित याचा अर्थ, या अधिनियमाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित केलेला, असा आहे;
(e)(ङ)(इ) प्रवासपत्र याचा अर्थ, या अधिनियमान्वये दिलेले किंवा दिले गेल्याचे मानण्यात येणारे प्रवासपत्र असा आहे .

Leave a Reply