Passports act कलम २१ : प्रत्यायोजन करण्याची शक्ती :

पारपत्र अधिनियम १९६७
कलम २१ :
प्रत्यायोजन करण्याची शक्ती :
केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निदेश देऊ शकेल की, कलम ६ पोटकलम (१), खंड (घ) खालील शक्ती किंवा त्या कलमाचे पोटकलम (२), खंड (झ) खालील शक्ती किंवा कलम २४ खालील शक्ती खेरीजकरून, या अधिनियमान्वये त्याला जी कोणतीही शक्ती वापरता येते त्या शक्तीचा वापर किंवा तदन्वये त्याला जे कार्य करता येते ते कार्य, अधिसूचनेत ते विनिर्दिष्ट करील अशा बाबींच्या संबंधात आणि अशा कोणत्याही शर्ती असल्यास त्या शर्तीच्या अधीनतेते अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे –
(a)(क)(अ) केंद्र शासनाला दुय्यम असलेल्या अशा अधिकाऱ्याला किंवा प्राधिकरणाला; किंवा
(b)(ख)(ब) कोणत्याही राज्य शासनाला किंवा अशा शासनाला दुय्यम असेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा प्राधिकरणाला; किंवा
(c)(ग) (क)जेथे भारताची वकिलात नाही अशा कोणत्याही परकीय देशात, तशा विदेशी वाणिज्यदौतिक अधिकाऱ्याला, –
करता येईल.

Leave a Reply