पारपत्र अधिनियम १९६७
कलम २० :
भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे देणे :
पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्याशी संबंधित असलेल्या पूर्वगामी उपबंधामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीला, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देणे हे लोकहिताचे आहे असे त्या शासनाचे मत असेल तर, त्याप्रमाणे तिला पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देऊ शकेल किंवा देण्याची तजवीज करू शकेल .