पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७
(सन १९६७ चा १५)
(२४ जून १९६७)
प्रस्तावना :
कलम १ :
संक्षिप्त नाव व विस्तार :
भारतीय नागरिक आणि इतर व्यक्ती यांच्या भारताबाहेर प्रयाण करण्याबाबत नियमन करण्याच्या दृष्टीने त्यांना पासपोर्ट व प्रवासपत्रे दण्यासाठी आणि त्यास आनुषंगिक व साहाय्यभूत बाबींचा उपबंध करण्यासाठी अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या अठराव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
————-
(१) या अधिनियमास, भारतीय पारपत्र अधिनियम, १९६७ असे म्हणता येईल
(२) त्याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे आणि भारताबाहेर असलेल्या भारतीय नागरिकांनाही तो लागू आहे.