पारपत्र अधिनियम १९६७
कलम १३ :
अटक करण्याची शक्ती :
(१) केंद्र शासनाने याबाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे ज्याला शक्ती प्रदान केलेल्या असतील असा कोणताही सीमाशुल्क अधिकारी आणि फौजदाराच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी १.(किंवा उत्प्रवासन अधिकारी) ज्या व्यक्तीविरूद्ध, तिने कलम १२ अन्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध केल्याचा वाजवी संशय असेल अशा कोणत्याही व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करू शकेल आणि तो शक्य होईल तितक्या लवकर त्या व्यक्तीला अशा अटकेची कारणे विदित करील
(२) या कलमान्वये अटक करणारा प्रत्येक अधिकारी, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला; अनावश्यक विलंब न करता, त्या प्रकरणाच्या बाबतीत अधिकारिता असणाऱ्या दंडाधिकाऱ्यापुढे, किंवा सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यापुढे घेऊन जाईल, किंवा पाठविल आणि अशा कोणत्याही अटकेच्या बाबतीत २.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७३ चा २), कलम ५७) याचे उपबंध शक्य असेल तेथवर लागू होतील .
——-
१. १९९३ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ७ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. १९७८ चा अधिनियम क्रमांक ३१ याच्या कलम ३ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.