पारपत्र अधिनियम १९६७
कलम १२ :
अपराध व शिक्षा :
(१) जो कोणी –
(a)(क)(अ) कलम ३ च्या उपबंधांचे उल्लंघन करील; किंवा
(b)(ख)(ब) या अधिनियमानुसार पासपोर्ट किंवा प्रवासपत्र मिळवण्याच्या हेतूने, जाणूनबुजून कोणतीही चुकीची माहिती देईल किंवा कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती दडपून ठेवील अथवा पासपोर्टात किंवा प्रवासपत्रात केलेल्या नोंदीमध्ये कायदेशीर प्राधिकाराशिवाय फेरबदल करील किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करील किंवा फेरबदल करवील; किंवा
(c)(ग) (क)विहित प्राधिकरणाने तपासणीसाठी मागवलेला आपला पासपोर्ट किंवा प्रवासपत्र (मग ते या अधिनियमाखाली दिलेले असो किंवा नसो) सादर करण्यात कसूर करील; किंवा
(d)(घ) (ड)दुसऱ्या व्यक्तीला दिलेल्या पासपोर्टाचा किंवा प्रवासपत्राचा जाणूनबुजून वापर करील; किंवा
(e)(ङ)(इ) त्याला स्वत:ला दिलेला पासपोर्ट किंवा प्रवासपत्र दुसऱ्या व्यक्तीला जाणूनबुजून वापरू देईल, –
१.(तो दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास) किंवा या दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल.
(1-A)२.(१-क(अ)) भारताचा नागरिक नसेल अशा जो कोणी –
(a)(क)(अ) त्याच्या राष्ट्रीयत्वाविषयीची माहिती दडपून ठेवून पासपोर्टासाठी अर्ज करील किंवा पासपोर्ट मिळवील; किंवा
(b)(ख)(ब) बनावट पासपोर्ट किंवा कोणतेही प्रवासपत्र धारण करील,तो, एक वर्षापेक्षा कमी नसेल; परंतु, पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दहा हजारांपेक्षा कमी नसेल परंतु, पन्नास हजारांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास पात्र असेल.)
(२) जर कोणी पोटकलम २.((१) किंवा पोटकलम (१-क)) खाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाला अपप्रेरणा दिली आणि ज्या अपप्रेरणा दिली तो अपराध अपप्रेरणेच्या परिणामी घडला असेल तर, त्या पोटकलमामध्ये त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या शिक्षेला तो पात्र ठरेल
(३) जर कोणी पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या कोणत्याही शर्तींचे किंवा या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधाचे किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले व त्यासाठी या अधिनियमामध्ये अन्यत्र कोणत्याही शिक्षेचा उपबंध करण्यात आलेला नसेल तर, तो तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा या दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल
(४) जो कोणी एकदा या अधिनियमाखालील दोषी ठरवण्यात आला असेल, तो नंतरच्या अपराधासाठी उपबंधित असलेल्या शिक्षेच्या दुप्पट शिक्षेस पात्र ठरेल .
——-
१. १९९३ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ६ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९९३ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.