Nsa act 1980 कलम ८ : स्थानबद्धता आदेशाची कारणे त्या आदेशाचा परिणाम होणाऱ्या व्यक्तींना उघड करणे :

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम ८ :
स्थानबद्धता आदेशाची कारणे त्या आदेशाचा परिणाम होणाऱ्या व्यक्तींना उघड करणे :
(१) ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्थानबद्धता आदेशाच्या अनुरोधाने स्थानबद्ध करण्यात आले असेल त्यावेळी आदेश काढणारा प्राधिकारी, शक्य तितक्या लवकर, परंतु सर्वसाधारणपणे स्थानबद्धतेच्या दिनांकापासून पाच दिवसांच्या आत आणि अपवादात्मक परिस्थितीत व त्याची कारणे लेखी नमूद करून स्थानबद्धतेच्या दिनांकापासून १.(पंधरा दिवसांच्या) आत त्या व्यक्तीला, तो आदेश ज्या कारणांच्या आधारे काढण्यात आला ती कारणे कळवील आणि तिला त्या आदेशाविरूद्ध समुचित शासनाकडे अभिवेदन करण्याची संधी लवकरात लवकर उपलब्ध करून देईल.
(२) कोणत्याही वस्तुस्थिती निदर्शक गोष्टी उघड करणे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अयोग्य आहे असे त्या प्राधिकाऱ्यास वाटत असेल तर, पोटकलम (१) मधील कोणत्याही गोष्टीकडे त्यास त्या उघड करणे भाग पाडणार नाही.
——–
१. १९८४ चा अधिनियम क्रमांक २४ कलम ३ नुसार दहा दिवसांच्या ऐवजी घातले गेले.(५-४-१९८४ पासून).

Leave a Reply