Npds act कलम २७ : कोणतीही गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाचे सेवन करण्यासाठी शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम २७ :
कोणतीही गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाचे सेवन करण्यासाठी शिक्षा :
जो कोणी, कोणतेही गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाचे सेवन करेल, तो-
अ) सेवन केलेले गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ हा कोकेन, मॉर्फिन, डायसेंटिल मॉर्फिन किंवा इतर कोणतेही औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणारा पदार्थ असेल किंवा ते केंद्र शासनाने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे याबाबतीत विनिर्दिष्ट केलेल्या औषधी द्रव्यांपैकी किंवा पदार्थांपैकी असल्यास, अशा बाबतीत एक वर्षापर्यंतच्या सक्त मजूरीची कैदेची शिक्षा किंवा पंचवीस हजार रूपयेपर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षास पात्र असेल; आणि
ब) सेवन केलेले औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ हा खंड (अ) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्याखेरीज अन्य असेल अशा बाबतीत, सहा महिन्यापर्यंतच्या कैदेची शिक्षा किंवा दहा हजार रूपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्यास पात्र असेल.
ब) सेवन केलेले औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ हा खंड (अ) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्याखेरीज अन्य असेल अशा बाबतीत, सहा महिन्यापर्यंतच्या कैदेची शिक्षा किंवा दहा हजार रूपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्यास पात्र असेल.
स्पष्टीकरण –
१) या कलमाच्या प्रयोजनासाठी, अल्प प्रमाणात याचा अर्थ, केंद्र शासनाने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केले असेल इतक्या प्रमाणात.
२) एखाद्या व्यक्तीकडे अल्प प्रमाणात गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ असतील अशा बाबतीत ते त्या व्यक्तीच्या स्वत:च्या वापरासाठी होते, विक्री किंवा वितरणासाठी नव्हते, हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असेल.

Leave a Reply