Ndps act कलम ९अ : नियत्रित पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचा व त्यांचे विनियमन करण्याचा अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ९अ :
नियत्रित पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचा व त्यांचे विनियमन करण्याचा अधिकार :
१) कोणत्याही गुंगीकारक औषधी द्रव्याच्या किंवा मनोव्यापारांवर परिणाम उत्पादनामध्ये किंवा निर्मितीमध्ये होणारा कोणत्याही नियंत्रित पदार्थांचा वापर लक्षात घेता त्याचे उत्पादन निर्मिती, पुरवठा आणि वितरण यांचे व त्याच्या व्यापारउदमीचे विनियमन करण्याची किंवा त्यास मनाई करण्याची तरतूद करणे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक किवा इष्ट आहे असे केंद्र सरकारचे मत असेल, तर त्याला एक आदेश काढून त्याद्वारे अशी तरतूद करता येईल.
२) पोट-कलम (१) द्वारे बहाल करण्यात आलेल्या अधिकाराच्या सर्वसाधारणतेला बाध न येता, त्या पोट-कलमान्वये दिलेल्या आदेशामध्ये कोणत्याही qनयत्रित पदार्थाच्या उत्पादनाचे, निर्मितीचे, कब्जाचे, वाहतुकीचे, आंतरराज्यीय आयातीचे, आंतरराज्यीय निर्यातीचे, विक्रीचे, खरेदीचे, सेवनाचे, वापराचे, साठवणाचे, वाटपाचे, विल्हेवाटीचे किंवा संपादनाचे लायसंनाद्वारे, परवायांद्वारे किंवा अन्य प्रकारे विनियमन करण्याची तरतूद करता येईल.

Leave a Reply