Ndps act कलम ८१ : राज्य व विशेष विधींची व्यावृत्ती :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ८१ :
राज्य व विशेष विधींची व्यावृत्ती :
या अधिनियमातील किंवा त्याअन्वये करण्यात आलेल्या नियमांतील कोणत्याही गोष्टीमुळे कॅनॅबिस रोपट्याच्या लागवडीसाठी किंवा त्याच्या वापरासाठी किंवा कोणतेही अमली औषधी द्रव्य वा मन:प्रेरक पदार्थ यांच्या भारतांतर्गत क्रयविक्रयासाठी या अधिनियमाद्वारे लादण्यात आले नसेल असे कोणतेही निर्बंधन किंवा उपबंधित करण्यात आली नसेल अशी शिक्षा लादणारा किंवा उपबंधित करणारा किंवा या अधिनियमाद्वारे वा अन्वये लादण्यात आलेले तत्सम निर्बंधन किंवा उपबंधित करण्यात आलेली तत्सम शिक्षा यापेक्षा अधिक तीव्रतेने निर्बंधन किंवा शिक्षा लादणारा ज्या काळापुरता अमलात असणारा कोणताही प्रांतिक अधिनियम किंवा कोणत्याही राज्य विधानमंडळाचा कोणताही अधिनियम व त्याअन्वये करण्यात आलेला कोणताही नियम, यांच्या विधीग्राह्यतेवर परिणाम होणार नाही.

Leave a Reply