गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७३ :
अधिकारक्षेत्राला प्रतिबंध :
कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा प्राधिकरणाने या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये पुढीलपैकी कोणत्याही बाबतीत दिलेल्या कोणत्याही निर्णयावर किंवा आदेशावर कोणत्याही दिवाणी न्यायालयात कोणताही दावा किंवा कार्यवाही दाखल करून घेण्यात येणार नाही, त्या बाबी म्हणजे-
अ) अफूच्या झाडांची लागवड करण्याबाबतचे लायसन रोखून धरणे, नाकारणे किंवा रद्द करणे;
ब) अफूचा दर्जा आणि घनता यांनुसार तिचे वजन, तपासणी व वर्गीकरण आणि अशा तपासणीनुसार प्रमाण किंमतीत करण्यात आलेली वाढ किंवा घट;
क) कोणत्याही अन्य प्रकारच्या पदार्थांत मिसळण्यात आलेली अफू जप्त करणे.
