गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७२ :
शासनाला येणे असलेल्या रकमांची वसुली :
या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांच्या किंवा आदेशांच्या कोणत्याही तरतुदींन्वये केंद्र सरकारला किंवा राज्य शासनाला येणे असलेली अनुज्ञप्ती फी किंवा कोणत्याही प्रकारची इतर रक्कम यांच्या संबंधात अशा रकमेची मागणी करण्यासाठी अधिकार देण्यात आलेला केंद्र सरकारचा किंवा यथास्थिती राज्य शासनाचा कोणताही अधिकारी, ज्या व्यक्तीकडून अशी रक्कम वसूल करावयाची असेल किंवा येणे असेल अशा व्यक्तीला देणे असलेल्या कोणत्याही रकमेतून अशी रक्कम वजा करू शकेल किंवा अशा व्यक्तीच्या मालकीच्या वस्तू जप्त करून किंवा त्यांची विक्री करून ती रक्कम वसूल करू शकेल आणि जर अशी रक्कम वसूल होण्याजोगी नसल्यास ती रक्कम त्या व्यक्तीकडून किंवा तिचा जामीनदार असल्यास त्याच्याकडून जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करील.
