Ndps act कलम ६८-पी : वर्णनात चूक झाल्यामुळे नोटीस किंवा आदेश बेकायदेशीर न ठरणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-पी :
वर्णनात चूक झाल्यामुळे नोटीस किंवा आदेश बेकायदेशीर न ठरणे :
या कलमान्वये काढण्यात आलेली किंवा बजावण्यात आलेली कोणतीही नोटीस, केलेले कोणतेही प्रतिज्ञापन आणि काढलेला कोणताही आदेश नमूद केलेल्या मालमत्तेच्या किंवा व्यक्तीच्या वर्णनातून अशी मालमत्ता किंवा व्यक्ती यांची ओळख पटत असल्यास त्यात नमूद करण्यात आलेल्या मालमत्तेच्या किंवा व्यक्तीच्या वर्णनातील कोणत्याही चुकीमुळे ती नोटीस, प्रतिज्ञापन किंवा आदेश बेकायदेशीर असल्याचे मानण्यात येणार नाही.

Leave a Reply