गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-ड :
सक्षम प्राधिकारी :
१) केंद्र सरकार शासकीय राजपत्रात आदेश प्रसिद्ध करून कोणत्याही कस्टम कलेक्टरला, उत्पादन शुल्क कलेक्टरला किंवा आयकर आयुक्ताला किंवा केंद्र शासनाच्या समान दर्जाच्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याला या प्रकरणाखालील सक्षम प्राधिकरणाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्राधिकृत करू शकेल.
२) सक्षम प्राधिकारी, केंद्र सरकार आदेशाद्वारे सूचित करील अशा व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या वर्गाच्या बाबतीत आपली कर्तव्ये पार पाडील.
