Ndps act कलम ६८-के : मालमत्ता सरकारजमा करण्याऐवजी दंड :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-के :
मालमत्ता सरकारजमा करण्याऐवजी दंड :
१) कलम ६८ आय अन्वये कोणतीही मालमत्ता केंद्र शासनाकडे जमा होईल असे सक्षम प्राधिकरण जाहीर करील आणि बेकायदेशीरपणे संपादित केलेल्या मालमत्तेच्या भागाचा साधनमार्ग सक्षम प्राधिकरणाचे समाधान होईल अशा पद्धतीने सिद्ध करण्यात आलेला नसेल अशा बाबतीत, सक्षम प्राधिकरण बाधित व्यक्तीला मालमत्ता सरकारजमा करण्याऐवजी अशा भागाच्या बाजारमूल्याइतकी दंडाची रक्कम भरण्याचा विकल्प देणारा आदेश काढील.
२) पोटकलम (१) अन्वये दंड लादण्याचा आदेश काढण्यापूर्वी बाधित व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची योग्य संधी देण्यात आली पाहिजे.
३) बाधित व्यक्ती पोटकलम (१) खालील देय दंड अशाबाबतीत अनुज्ञेय असलेल्या वेळात भरील अशा वेळी कलम ६८ आय खालील मालमत्ता सरकारजमा करण्याची घोषणा सक्षम प्राधिकरण आदेशाद्वारे मागे घेईल आणि त्यानंतर अशी मालमत्ता अशा सरकारजमा होण्यापासून मुक्त होईल.

Leave a Reply